अखेरचा ब्लॅकबेरी की-वन स्मार्टफोन लाँच


कॅनेडियन कंपनी ब्लॅकबेरीने त्यांचा शेवटचा इनहाऊस डिझाईनच्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन की-वन नावाने बार्सिलोना येथे सुरू असलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच केला आहे. एप्रिल २०१७ पासून तो विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनची किंमत आहे ५४९ डॉलर्स. या फोनला टच डिस्प्ले सह फिजिकल की बोर्ड दिला गेला आहे.

अन्य फिचर्समध्ये ५.५ इंची फुल स्क्रीन असूनया टचस्क्रीनवर सहज टायपिंग करता येणार आहे. सिक्युरिटी व त्या संदर्भातली सारी सॉफ्टवेअर इंस्टॉल केली गेली आहेत. सप्टेंबर २०१६ मध्येच कंपनीने यापुढे स्मार्टफोन बनविले जाणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा शेवटचा फोन आहे. फोनसाठी अँड्राईड नगेट ७.० ओएस, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ती २ टेराबाईट म्हणजे २०२४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. १२ एमपीचा रियर तर ८एमपीचा फ्रंट कॅमेरा असून ३०५० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. बॅटरी क्विव चार्ज तंत्रज्ञानासह आहे शिवाय सोनी आयएमएकस ३७ सेंन्सरही दिला गेला आहे. हा फोन फोर जी ला सपोर्ट करतो.

Leave a Comment