सौंदर्याची आस कुणाला नसते? सारे जगच सौंदर्याचे दिवाने आहे. त्यातही आपल्यासाठी ज्या कांही गोष्टी माणूस पसंत करतो त्यात मुख्यत्वाने सुंदर गोष्टींना अधिक प्राधान्य मिळणे स्वाभाविकच. रशिया देश जगात अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. लोखंडी पडद्यामागचा देश अनेक गुपितेही बाळगून आहे. त्यातही दोन गोष्टींसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. एक म्हणजे इथली जीवघेणी थंडी व दुसरी म्हणजे येथल्या सुकुमार सुंदर युवती. रशियन महिलांचे सौंदर्य जगात नंबर एकचे समजले जाते व त्यामुळे येथे वाईफ टूरिझमसाठी अन्य देशांतून येणार्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.
सुंदर बायको हवी, वाईफ टूरिझमसाठी रशियाला जा.
वाईफ टूरिझम म्हणजे अन्य देशातील नागरिक रशियात बायको शोधण्यासाठी आवर्जून येतात. त्यात सर्वाधिक पर्यटक चीनमधले आहेत. त्याचेही कारण असे की चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसीमुळे मुलींचे प्रमाण कमी आहे व आता लग्नाळू वयात असलेल्या मुलांना तेथे मुली मिळत नाहीत. दुसरे म्हणजे रशियात मुलांपैक्षा मुलींची संख्या जास्त आहे व या मुली सौंदर्यवती आहेत. चीनी तरूण या बाबतीत सायबेरियातील मुलींना अधिक पसंती देतात. कारण या भागातील मुली अधिक सुंदर असतात. रशियात वाईफ टूरिझम हा आता व्यवसायच बनला आहे.
रशियातील काही कायदेशीर विवाह संस्था लग्नाळू युवकांची त्यांना पसंत पडेल अशा मुलींबरोबर भेट घडवून आणतात. अन्य देशांतील बडे बडे बिझिनेसमनही सुंदर पत्नीच्या शोधात रशियात येतात. त्यासाठी मॅरेज ब्युरोंची लाखो रूपयांची फी भरतात. अर्थात रशियन मुली स्वदेशी जोडीदाराला अधिक प्राधान्य देत असल्या तरी शेकडोंनी मुलींनी रशियाबाहेरच्या मुलांशी विवाह केले आहेत. रशियन मुलीबरोबर लग्न केले तर मुलाला रशियाची कायदेशीर विवाहपद्धती स्वीकारावी लागते असेही समजते.