लोंबार्गिनीची अॅव्हेंटाडोर ३ मार्चला भारतात


इटालियन सुपरकारमेकर लोंबार्गिनी त्यांची अॅव्हेंटाडोर एस ही लग्झरी कार ३ मार्च रोजी भारतात लाँच करत आहे. ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात यापूर्वीच लाँच केली गेली आहे. भारतीय ऑटो बाजारात यापूर्वी फेब्रुवारीमध्येच लोंबार्गिनीने त्यांची हुराकेन आरडब्ल्यूडी स्पायडर लाँच केली आहे.

लोंबार्गिनी अॅव्हेंटाडोर साठी ६.५ लिटर व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. अवघ्या २.९ सेकंदात ही कार ३५० किमीचा वेग घेऊ शकते. तिला सिरॅमिक डिस्क ब्रेकसही दिले गेले आहेत. स्टाईल, स्टेटमेंट व कंफर्टच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार्‍या या कारला कांही खास फिचर्स दिले गेले आहेत. कमी वेग असताना या कारची मागची चाके पुढच्या चाकांच्या तुलनेत ३० डिग्री विरूद्ध टर्न होतात व हायस्पीड असताना त्याच दिशेने १५ डिग्री टर्न घेण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे कमी स्पीडवरही चांगला टर्निंग रेडियस मिळू शकतो. कारच्या फ्रंट बंपर, रियर बंपर, डिफ्यूजर,एअर इनटेक्स मध्येही अनेक बदल केले गेले आहेत. कारला इजीओ ड्रायव्हिंग मोड दिला गेला आहे.