रिलायन्स जिओ फोर जी डेटा कॉलिंग सेवेने टेलिकॉम क्षेत्रात देशभरात धमाल केली असतानाच रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता अॅप आधारित कॅब सेवा क्षेत्रातही पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले आहे. रिलायन्स जिओ अॅपआधारित कॅब सेवा क्षेत्रात या वर्षअखेर प्रवेश करत असून त्यामुळे ओला, उबेर या कंपन्यांना चांगलाच फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
रिलायन्स जिओची कॅब सेवा वर्षअखेरीपासून ?
मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स जिओच्या कॅब सेवेचा प्रारंभ बंगलोर व चेन्नई येथून केला जाणार आहे. मुकेश अंबानी यांनी कॅब सेवा क्षेत्रात उतरण्याची तयारी पूर्वीच केली होती मात्र व्यावसायिक पातळीवर त्याच्या तयारीसाठी सहा महिन्यांचा अवधी त्यांना हवा होता. या सेवेसाठी रिलायन्सने महिंद्रा व हुंडाई या ऑटो कंपन्यांशी संपर्क साधला असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या अॅप अधारित कॅब सेवा क्षेत्रावर उबेर, ओला व मिनी यासारख्या हाताच्या बोटावर मोजल्या जाणार्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे रिलायन्सला सुरवात या कंपन्यांबरोबर संघर्ष करूनच करावी लागणार आहे. मात्र झालेल्या सर्वेक्षणांनुसार ग्राहक रिलायन्स कॅब सेवेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे.