भीम अ‍ॅपने नोंदविला विश्‍वविक्रम


नवी दिल्ली – भारत सरकारने लेसकॅश इकॉनमी अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च केलेल्या भीम अ‍ॅपने एक विश्‍वविक्रम नोंदविला आहे. नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, भीम अ‍ॅपला तब्बल 1.70 कोटींवेळा डाऊनलोड करण्यात आले असून जो की एक विश्‍वविक्रम आहे.

मोदी सरकारने मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी लॉन्च केलेल्या BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅपचा उद्देश डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे होते. या अ‍ॅपची विशेषता म्हणजे इंटरनेट नसतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये USSD कोड *99 डायल करूनही हे अ‍ॅप ऑपरेट करता येते. भीम अ‍ॅपला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. अमिताभ कांत म्हणाले, हे अ‍ॅप भारतात खूपच यशस्वी ठरले असून ते चांगल्या प्रकारे काम करत आहे.

दरम्यान, लॉन्चिंगच्या 3 दिवसांतच गूगल प्ले स्टोरच्या फ्री अ‍ॅप चार्टमध्ये भीम अ‍ॅप टॉपवर पोहचले होते. तसेच लॉन्चिंगच्या एका महिन्यात भीम अ‍ॅपला ऐंड्रॉयड प्लॅटफॉर्मवर 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे पैसे पाठविण्यासाठी संबंधिताला फक्त एकदा आपला बँक अकाऊंट नंबर रजिस्टर करावा लागतो आणि त्यानंतर एक यूपीआय पिनकोड जनरेट होतो. त्यानंतर तुम्ही कॅशलेस व्यवहार सहजपणे करू शकता.

Leave a Comment