नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी जग्वार लँडरोव्हर इंडियाने आपली नवी जग्वार एक्सएफ भारतामध्ये नुकतीच लाँच केली असून अत्याधुनिक असे फिचर्स या नव्या लक्झरी कारमध्ये देण्यात आले आहेत. ही नवी कार ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास कंपनीला आहे.
भारतात लाँच जग्वारची नवी एक्सएफ
पेट्रोल वेरियंट असणा-या या कारमध्ये २.० लिटरचे ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले असून या इंजिनमध्ये २३७ बीएचपी पॉवर आणि 340 एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे. त्याचबरोबर ७ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. डिझेल इंजिन असणा-या या मॉडेलमध्ये २.० लिटरचे ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. यामाध्यमातून १७७ बीएचपीची पॉवर आणि ४३० एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे. या कारची किंमत ४७.५० लाखांपासून ते ६०.५ लाखांपर्यंत (दिल्ली – एक्स शोरुम) ऐवढी आहे.