सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून फोर्ब्स २०१६ च्या यादीत झळकलेला बॉक्सर फ्लॉईड मेवेदर त्याच्या पर्सनल लाईफ मुळे व ऐयाशीमुळे नेहमीच चर्चेत असतो. २४ फेब्रुवारीला त्याने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने पुन्हा एकदा त्याच्या शौकांची चर्चा सुरू झाली आहे.
फ्लॉईड मेवेदरची शौकीन राहणी
प्रचंड पैसा मिळविलेल्या व तो हवा तसा खर्च करणार्या मेवेदरला मनी मॅन म्हणूनही लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या घरात नेहमीच सगळीकडे नोटा पसरलेल्या असतात व बॅगा भरभरून कॅश तो नेहमी जवळ बाळगतो. २२७२ कोटींचा मालक असलेल्या मेवेदरची अनेक आलिशान घरे आहेत. लास वेगास येथील बिग बॉय मॅन्शन नावाच्या त्याच्या २२ हजार चौरस फुटाच्या घरात नोटांचे गालिचे अंथरलेले असतात असे सांगितले जाते. त्याचे मियामीतही एक घर आहे. शॉपिंगचा शौकीन असलेला मेवेदर बरोबर नेहमी पैसे भरलेल्या बॅगा बाळगतो. त्याच्या मालकीच्या अनेक कार्स असून लास वेगास मधील घरात पांढर्या रंगांच्या तर मियामीतील घरात काळ्या रंगांच्या कार्सचा ताफा असतो. त्याचे स्वतःचे विमानही आहे.
असे सांगतात की तो कोणताही बूट जोड एकदाच वापरतो. ज्युवेलरीचा त्याला शौक आहे व नुकतेच त्याचे ७० लाख डॉलर्स किमतीचे दागिने चोरीला गेले. दरवर्षी तो ६५०० डॉलर्सच्या हाफपँट विकत घेतो व प्रत्येक पँट एकदाच वापरतो. ४९ मॅचेस तो आत्तापर्यंत खेळला आहे व त्यात एकदाही हरलेला नाही. सप्टेंबर २०१५ मध्ये आंद्रे बेर्टोला हरवून त्याने खेळातून संन्यास घेतला आहे.