नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सुमारे चार कोटी सदस्यांसाठी पुढील महिन्यात आवास योजना सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत ईपीएफओ सदस्य घराची खरेदी करण्यासाठी ईपीएफ खात्यातून भरणा किंवा ईएमआय देऊ शकणार आहेत.
ईपीएफओ सदस्यांसाठी आवास योजना
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निधी संघटनाने (ईपीएफओ) आपल्या ग्राहकांसाठी एक आवास योजना निश्चित केली आहे. या योजनेची घोषणा 8 मार्चनंतर केव्हाही घोषीत करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असून त्याची आचारसंहिता 8 मार्च रोजी समाप्त होणार आहे. या योजनेंतर्गत ईपीएफओ आपल्या सदस्यांना त्यांच्या सेवाकालावधीत घर खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे.
यासाठी ईपीएफओच्या सदस्यांनी कंपनीतील आपल्या इतर सदस्यांसह एक हाऊसिंग सोसायटी स्थापन करावी लागणार आहे. या सोसायटीला बँक आणि बिल्डर अथवा विक्रेत्याकडून घर खरेदी करता येऊ शकेल. या योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कमीत कमी 20 सदस्य असणे आवश्यक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओचे सदस्य विविध आवास योजना उदा. पंतप्रधान आवास योजनांतर्गत मिळणारे फायदेही एकसोबत घेऊ शकणार आहे. यामुळे सरकार सर्व आवास योजनांचे लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होईल.