व्हॉट्सअॅपचे स्टेटस अपडेट केले का?


भारतीय व्हॉट्सअॅप सर्वाधिक वापरण्यात अव्वल असून व्हॉट्सअॅपने वेळोवेळी वेगवेगळे फिचर्स देत आपल्या युजर्सना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअॅपने आता ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे आणखी एक फिचर आणले आहे.

व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर अँड्राईड आणि विंडोज फोनवर अपडेट झाले असून युजर्स या नव्या फिचर वापर करून आपले स्टेटस क्रिएट करू शकतात. ते यावर फोटो, व्हिडिओ, जीआयएफ फाईल्स शेअर करू शकतात. त्यावर कॅप्शन लिहून शकतात. हे स्टेटस २४ तासांनंतर डिसअपिअर होणार आहे. या स्टेटसवर मेसेजही करू शकता. थोडक्यात इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरी या फिचर्सच्या अगदी जवळ जाणारे हे फिचर असल्यामुळे व्हॉट्सअॅपने काही वेगळे काही दिले नाही अशाही टीकाही होत आहे. पण शेवटी व्हॉट्सअॅपचे युजर्स हे सर्वाधिक असल्यामुळे व्हॉट्सअॅपचे हे फिचर युजर्सना तरी पहिल्या क्षणात पसंत पडले आहे. तेव्हा तुम्हीही व्हॉट्सअॅपवरच्या जुन्या ‘available’, ‘DND’, ‘meeting’, अशा रटाळ स्टेटसला सोडचिठ्ठी द्या आणि नवे काहितरी ट्राय करा.

Leave a Comment