ऑडी यंदा बाजारात उतरवणार १० कार


नवी दिल्ली – या वर्षात १० नवीन कार जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत उतरवणार असून आपली प्रतिस्पर्धी मर्सिडीज बेन्झला टक्कर देत लक्झरी कार प्रकारात पुन्हा प्रथम स्थान पटकाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय बाजारात आणण्यात येणा-या एकूण १० कारपैकी २ कारचे मॉडेल पूर्णतः नवीन असणार आहे.

कंपनीकडे भारतीय बाजारात विस्तार करण्यासाठी अनेक संधी असून त्यांचा लाभ घेण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहे. कंपनी लवकरच भारतातील लक्झरी कार प्रकारात प्रथम स्थान पटकावेल, कारण कंपनीकडे यासाठी लागणारी गुणवत्ता आहे, असे कंपनीचे भारतातील प्रमुख राहिल अन्सारी यांनी म्हटले. मात्र यासाठी किती कालावधीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. २०१३मध्ये जर्मनीच्या बीएमडब्ल्यूला कंपनीने मागे टाकत प्रथम स्थान पटकावले होते. मात्र मर्सिडीज बेन्झने २०१५मध्ये ऑडीला मागे टाकल्याने कंपनी सध्या दुस-या स्थानी आहे.

Leave a Comment