नवी जग्वार एक्सएफ भारतात लाँच


लग्झरी कार मधील अग्रणी जग्वार लँडरोव्हरने त्यांची नवी जग्वार एक्सएफ ही कार पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच केली आहे. या कारच्या डिझेल व्हर्जनच्या किमती ४७.५० पासून ६०.५० लाखांपर्यंत तर पेट्रोल व्हर्जनच्या किमती ५२.५० ते ५९.५० लाख (एक्स शो रूम) अशा आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये कंपनीने डिझेल व्हर्जन ४९.५० लाख बेस प्राईजला मिळेल अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात हे मॉडेल दोन लाख रूपये कमी किमतीत सादर केले गेले आहे.

पेट्रोलसाठी २.० लिटरचे चार सिलींडर टर्बोचार्ज्ड इंजिन तर डिझेलसाठी २.० लिटर इंजिन दिले गेले आहे. दोन्ही व्हेरिएंटसाठी ८ स्पीड ऑटो गिअर बॉक्स असून फ्रेमसाठी लाईटवेट अॅल्युमिनियमचा वापर केला गेला आहे. १०.२ इंची इंफोटेनमेंट सिस्टीम, लेजर हूड, १० कलर काँबियन्ट लायटिग, फोर झोन क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर्स दिले गेले आहेत.

Leave a Comment