नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसने आपली नवी टीव्हीएस बीएस-IV २०१७ इंजिनची वेगो नुकतीच लाँच केली असून अत्याधुनिक असे विशेष फिचर्स या नव्या स्कूटरमध्ये देण्यात आले आहेत.
टीव्हीएसने लाँच केली बीएस-IV इंजिनची वेगो २०१७
या स्कुटरमध्ये सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये 8 बीएचपीची पॉवर आणि ८ एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे. सिंक ब्रेक सिस्टिम, टेलिस्कोपिक प्रंट शॉकऑब्जर, फुल डिजिटल स्पीडोमीटर, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि डय़ुअल टोन सीट कव्हर देण्यात आला आहे. या स्कुटरची किंमत ५० हजार ४३४ रुपये (दिल्ली एक्स-शोरुम) ऐवढी आहे.