जिओ देणार ‘डीटूएच’ सेवाही मोफत


मुंबई: ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा देऊन मोबाईल सेवा बाजारपेठेत खळबळ माजविणारी ‘रिलायन्स जिओ’ आता डायरेक्ट टू होम’ (डीटूएच) सेवाही मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे वृत्त आहे. ‘जिओ’ची डीश आणि रिमोटची छायाचित्र समाजमाध्यमांवरून प्रसारीत होत आहेत.

जिओच्या सिमकार्डधारकांना सुरुवातीच्या काळात मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सुरुवातीच्या काळात मोफत डीटूएच सुविधा कंपनीच्या वतीने दिली जाणार आहे. तसेच जिओ डीटीएच सुविधेचे दरही इतर कंपन्यांच्या तुलनेने अधिक स्वस्त असतील; असे समजते. जिओ डीटूएचचा प्राथमिक प्लॅन केवळ ४९ ते ५५ रुपयांचा तर सर्वात महाग प्लॅन दोन ते अडीचशे रुपयांपर्यंत असू शकतो.

मार्च किंवा एप्रिल महिन्यात रिलायन्सची ब्रॉडबँड ग्राहकांसाठी ‘जिओ फायबर’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याच वेळी काही शहरांमध्ये जिओ डीटीएच सेवाही उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment