नवी दिल्ली – एअर इंडिया कंपनीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शानदार ऑफर आणली असून प्रवाशांनी एक तिकीट खरेदी केल्यास दोघेजण यात्रा करण्यास पात्र ठरणार आहेत, अशी ही ऑफर आहे. मात्र फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमध्ये प्रत्येक बुकिंगवर एक मोफत तिकीट ही ऑफर देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ३१ मेपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे आणि ३१ मेपर्यंत या ऑफरनुसार प्रवास करता येईल. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी यापूर्वी स्पाइसजेटनेही स्वस्त विमान तिकिटाची ऑफर आणली होती. सरकारी मालकीच्या विमान कंपनीने या ऑफरचे नाव ‘बाय वन फ्लाय टू’ असे दिले आहे. या ऑफरनुसार निवडक शहरांमध्ये ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात घरगुती विमान क्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ होत आहे. हवाई सेवा कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणत आहेत.