हवेवर चालणार टाटांची एअरपॉड कार


इलेक्ट्रीक व हायड्रोजन फ्यूएलचा विचार ऑटो कंपन्या गांभीर्याने करत असतानाच ऑटो क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्सने सर्वात पुढे मजल मारून हवेवर चालणारी कार बाजारात आणण्याची योजना आखली आहे. टाटा एअरपॉड नावाची ही कार तीन वर्षात बाजारात येईल असे सांगितले जात आहे.

या कारमध्ये काँप्रेस्ड एअरचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. मोटर डेव्हलपमेंट इंटरनॅशनलच्या सहकार्याने या योजनेचे काम सुरू असून या कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती पर्यावरणपूरक असेल, प्रदूषण करणार नाही व ७० रूपयाच्या इंधनात २०० किमीचे अंतर कापू शकेल. या फ्यूचरिस्टीक कारमुळे एनर्जी शॉर्टेजवरही चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे.

ही कार अन्य कारच्या तुलनेत वजनाला हलकी म्हणजे ९०७ किलोग्रॅमची असेल व तिची फ्रेम अॅल्युनिमियमपासून बनविली जाईल. टाटा मोटर्सच्या अॅडव्हान्स प्रॉडक्ट विभागाचे प्रमुख टीम लेवर्टन म्हणाले एअरपॉड प्रोजेक्ट टॅमो कारमध्येच अनेक बदल करून यशस्वी केला जाणार आहे. कारचा स्पीड, फिचर्स व किमतीबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.

Leave a Comment