६०० कर्मचा-यांना नारळ देणार स्नॅपडील


नवी दिल्ली – येत्या काही दिवसांत ई- कॉमर्समध्ये लोकप्रिय असलेली स्नॅपडील कंपनी आपल्या कर्मचा-यांमध्ये कपात करणार असून याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी कपात करण्यासंदर्भात प्रक्रिया स्नॅपडीलने गेल्या आठवड्यात सुरु केल्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनी स्नॅपडीलसोबतच व्हल्कन आणि फ्रीचार्ज विभागातील जवळपास ५०० ते ६०० कर्मचा-यांची कपात करणार आहे. सध्या आठ हजार कर्मचारी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

दरम्यान, भारतात गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच कंपनीला ई-कॉमर्समध्ये फायदा होत आहे. विशेषता, सर्व भागांत आमचा व्यवसाय चालू ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, आमचा व्यवसाय वाढविण्यास आमचे रिसोर्स आणि टीममध्ये सुधारणा करण्यात येत आहे, असे स्नॅपडील कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment