सॉससारखे पदार्थ बाटलीतून पूर्ण काढण्याचे तंत्रज्ञान विकसित


आपण नेहमीच अनुभव घेतो की टोमॅटो सॉस, केचप वा तत्सम पदार्थ अरूंद तोंडाच्या बाटल्यातून भरले जातात व बाटली संपत आली की हे पदार्थ पूर्णपणे बाटली बाहेर काढता येत नाहीत.परिणामी बरेचदा त्यातील शिल्लक पदार्थ वाया जातो. सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी येथेही वैज्ञानिकांनी आपले डोके लढवून असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे या पदार्थांचा शेवटचा थेंबही बाटलीला अजिबात न चिकटता बाहेर काढता येणार आहे.

मॅसेच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील संशोधकांनी असा एक लेप तयार केला आहे, जो बाटल्यांना आतून लावता येईल. हा लेप इतका बुळबुळीत असेल की त्यामुळे बाटलीत भरलेला कोणताही द्रव पदार्थ त्याला चिकटूच शकणार नाही. केवळ केचपच्याच नव्हे तर तरल पदार्थ भरण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स, डिंक यांच्या बाटल्यांसाठीही हा लेप वापरता येणार आहे. बाटली तयार करतानाच या लेपचा पातळ थर आतून दिला जाईल. त्यामुळे छोट्या तोंडाच्या बाटल्यातून हे पदार्थ काढताता त्याचा शेवटचा थेंबही बाहेर निघेल. हा लेप पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला गेला आहे. हे तंत्रज्ञान वापरात आले की अशा बाटल्यातून शिल्लक राहिल्याने वाया जाणारे पदार्थ उपयोगात आणले जातील.

Leave a Comment