मोफत ऍन्टी-व्हायरस देणार सरकार


नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून हॅकर आणि सायबर गुन्हय़ांपासून नागरिकांच्या लॅपटॉप आणि संगणकाची सुरक्षा करण्यासाठी मोफत ऍन्टी-व्हायरस देण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशकर प्रसाद यांनी दिली आहे. बॉटनेक क्लिनिंग ऍन्ड मालवेअर ऍनालिसिस सेंन्टरमध्ये या उपक्रमाची सुरुवात केली असून स्मार्टफोनधारकांनाही याचा लाभ घेता येईल. हा उपक्रम ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने सुरू करण्यात आला असून लवकरच नागरिकांना मोफत ऍन्टी-व्हायरस डाऊनलोड करता येणार आहे. या उपक्रमासाठी सरकारला ९० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी ही सेवा देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात वाढत्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

2 thoughts on “मोफत ऍन्टी-व्हायरस देणार सरकार”

Leave a Comment