पीएफ काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी


मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काढण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यात आली असून पीएफमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पैसे काढण्यासाठी एक पानी फॉर्म असणारआहे.

लग्नपत्रिकेसारख्या कागदपत्रांची अट आता पीएफचे पैसे काढण्यासाठी नसेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढायचे असल्यास अगोदर संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या लग्नाची पत्रिकाही द्यावी लागत होती. मात्र अशा कागदपत्रांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठीची जाचक प्रक्रिया कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएफचे पैसे ६ ते ७ कारणांसाठी कर्मचाऱ्यांना काढता येतात. नोकरी करत असताना पीएफची ९० टक्के रक्कम काढता येऊ शकते. नोकरी सोडून किमान दोन महिने पूर्ण झाले, असतील तर संपूर्ण रक्कम काढता येते. दरम्यान वैद्यकीय कारणांसाठी पैसे काढण्यासाठी पूर्वीचीच प्रक्रिया असेल. कर्मचाऱ्यांना त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अनिवार्य असेल.

Leave a Comment