चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या


मुंबई – चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर आता पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी नक्कीच या विशेष गाड्यांचा फायदा होईल. जबलपुर-कोइम्बतूर-जबलपुर साप्ताहिक सुफरफास्ट आणि गांधीधाम- तिरुनवेली- गांधीधाम विशेष अशा गाड्या असून कोकणातील अनेक स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. अनेक चाकरमानी कुटुंबासह एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्या की गावी जातात त्यांना याचा नक्कीच फायदा होईल.

११ मार्च ते ३ जून या काळात गाडी क्रमांक ०२१९८ जबलपुर-कोइम्बतूर ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रत्येक शनिवारी सकाळी ११ वाजता जबलपुरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता कोइम्बतूरला पोहोचेल.

१३ मार्च ते ५ जून या काळात गाडी क्रमांक ०२१९७ कोइम्बतूर-जबलपुर ही गाडी प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता कोइम्बतूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.२० ला जबलपुर स्थानकात पोहोचेल.

नरसिंगपुर, गदरवारा, पिपारिया, इटारसी, हर्डा, खांडवा, भुसावळ, मनमाड, इगतपुरी, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, मूकाम्बिका रोड, बायंदूर, उडुपि, मुल्कि, मंगलोर जंक्शन, कासारगड, कहानगड,पाय्यनुर,कन्नुर, थलासेरी, वडाकारा, कोझिकोड, त्रिरुर, शोरानुर जंक्शन आणि पलघाट स्थानकांवरया गाड्यांना थांबवण्यात येणार आहेत. या एक्सप्रेस गाड्यांना १८ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये एसी ३ टायर व एसी २ टायर यांचा एकत्रित १ डबा, एसी ३ टायर १ डबा, स्लीपर १० डबे, ४ जनरल डबे, एसएलआर २ डबे असणार आहेत.

१० एप्रिल ते ५ जून या काळात गाडी क्रमांक ०९४५८ गांधीधाम –तिरुनवेली ही विशेष गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी १.५० ला गांधीधाम स्थानकातून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तिरुनवेली स्थानकात पोहोचेल.

१३ एप्रिल ते ८ जून या काळात गाडी क्रमांक ०९४५७ तिरुनवेली- गांधीधाम ही विशेष गाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी ७.४५ ला तिरुनवेली येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० ला गांधीधाम येथे पोहोचेल.

भचौ ,समखिआली जंक्शन, धरांगधरा जंक्शन,विरंगम, अहमदाबाद, नादिआड, आनंद, वडोदरा, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळुण,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, उडुपि, मंगलोर जंक्शन, कासारगड, कन्नुर, कोझिकोड, त्रिरुर, शोरानुर जंक्शन,त्रिसुर, एर्नाकुलम जंक्शन, अल्लेपी, कोलाम, त्रिवेंद्रम, नागरकोईल टाउन आणि वाल्लियुर स्थानकात या गाड्या थांबविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांना १६ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये एसी २ टायर १, एसी ३ टायर ५, स्लीपर ६, जनरल २ आणि एसएलआर २ डबे असणार आहेत.

Leave a Comment