वैराण उजाड वाळवंटातील हिरवेगार गांव- हुकाचायना


दूरवर नजर जाईल तिथपर्यंत वैराण, ओसाड वाळवंट, वाळूचे डोंगर व त्यामधोमध मात्र हिरव्यागार निसर्गाने नटलेले चिमुकले गांव ही फक्त कल्पनाच असू शकते. वाळवंटात नैसर्गिक सरोवर, हिरवी दाट झाडी व त्यात विसावलेले एक छोटेसे गांव प्रत्यक्षातही आहे याची फारच थोड्या लोकांना कल्पना असेल. होय. पेरूवियन वाळवंटात असे एक स्वप्नातले गांव आहे. त्याचे नांव हुकाचायना.


पेरूनियन वाळवंट हे जगातल्या सर्वात वैराण वाळवंटातील एक मानले जाते. मात्र या वाळवंटातही जीवन आहे. येथील हुकाचायना गावात वस्ती आहे आणि पर्यटकांचे ते आवडते पर्यटन स्थळ असल्याने हॉटेल्स, दुकाने व अन्य सर्व सुविधाही आहेत. या गावात फक्त ९६ कुटुंबे राहतात. मात्र चारी बाजूनी वाळवंटाने घेरलेल्या या गावात नैसर्गिक सरोवर आहे. असे सांगतात या सरोवरात राजकुमारी अंघोळीसाठी गेली असताना एका शिकार्‍याने तिच्यावर नेम साधला. मात्र राजकुमारी हवेत उडून गेली व तिच्या उड्त्या कपड्यातून वाळूचे डोंगर तयार झाले.

वारा फिरेल तसे हे डोंगर अन्य वाळवंटातील डोंगरांप्रमाणेच इकडे तिकडे होतात. स्थानिक लोक पर्यटकांना या वाळूच्या डोगरांच्या माथ्यापर्यंत नेऊन आणतात कारण येथून दिसणारे सूर्यास्ताचे दृष्य फारच अप्रतिम असते.