भारतात लाँच झाला पॅनिक बटणचा पहिला फोन


नवी दिल्ली : भारतातील पहिला पॅनिक बटणचा फोन माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. हा फोन एलजीने बाजारात आणला असून या मॉडेलचे नाव के १० २०१७ असे आहे.

या मोबाईलच्या मागे पॅनिक बटण देण्यात आले आहे. सलग तीन वेळा पॅनिक बटण दाबल्यानंतर फोन ११२ या राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाशी कनेक्ट होईल. या नंबरवरुन पोलीस, अग्नीशमन, रुग्णवाहिका या सेवांची मदत घेतली जाऊ शकते. नेटवर्क नसतानाही हा फोन काम करु शकेल. मात्र जानेवारी २०१८ पासून जीपीएस सुविधा या फोनमध्ये सुरु करण्यात येईल. सर्व प्रकारच्या फोनमध्ये पॅनिक बटण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने एप्रिल २०१६ मध्येच दिले होते. पॅनिक बटणमुळे आपत्कालीन सुविधा तातडीने मिळवणे शक्य होईल.

Leave a Comment