बीएमडब्ल्यू आणतेय उडणारी बाईक


उडणार्‍या कार्स नजरेला पडण्याची वेळ प्रत्यक्षात आली असतानाच ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बीएमडब्ल्यू ने उडणार्‍या बाईकचा प्रयोग यशस्वी झाल्याचे जाहीर केले आहे. बीएमडब्ल्यू मोटोरॅडने लिगो टेक्निक कंपनीसह हॉवरराईड बाईक डिझाईन तयार केले असून या बाईक्स एरोप्लेनप्रमाणे उडू शकणार आहेत. त्यासाठी ट्वीन सिलींडर बॉक्स इंजिन व त्यासोबर टेलि लिव्हर सस्पेन्शन सारख्या खुब्यांचा वापर केला गेला आहे. यामुळेच ही बाईक अन्य बाईक्सपेक्षा वेगळी ठरली आहे.

बीएमडब्ल्यूचे डिझाईन हेड अलेंकझांडर बुकेन म्हणाले, लिगो टेक्निक व आर १२०० अॅडव्हेंचर सेटमधून हे अनोखे मॉडेल तयार करण्याची कल्पना फारच वेगळी होती. हे मॉडेल अद्यापी पूर्ण सक्रीय झालेले नाही मात्र ते यशस्वी बनविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल नक्कीच टाकले गेले आहे. कोपनहेगन ऑटो एक्स्पोमध्ये ते शोकेस केले गेले व हळूहळू युरोपच्या बाकी बीएमडब्ल्यू मोटोरॅड सेंटरमध्येही ते शोकेस केले जाणार आहे.

Leave a Comment