फेसबुकवर मोदी बनले सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते


नवी दिल्ली – फेसबुकवर जगातील सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनले असून फेसबुकवर ४ कोटी लोक पंतप्रधान मोदींना फॉलो करतात. नेहमीच सोशल नेटवर्कींग साईटवर मोदी चर्चेत असतात. जगातील चालू घडामोडींबद्दल सोशल साईटवर मत व्यक्त करत असतात. तरूणांशी संपर्क साधत असतात. यामुळे मोदींचे फॉलोअर्स जास्त आहेत. या शिवाय दुसरा क्रमांक लागतो तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा. त्यांना फेसबुकवर २ कोटी लोक फॉलो करतात.

Leave a Comment