सोशल मीडियात गाजर गँगचा धुमाकूळ


मुंबई: २०१४मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने वापरलेले सोशल मीडियाचे अस्त्र आता त्यांच्यावरच उलटले आहे. सोशल मीडियावर गाजर गँग म्हणून भाजपची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. यात भाजपच्या कमळासह, नेत्यांचाही समावेश आहे. व्हायरल झालेले मेसेज, फोटो आणि काही व्यंगचित्रे पाहता सोशल मीडियावरील वातावरण हे भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र आहे.

हे फोटो सोशल मीडियात Gajar gang नावाने व्हायरल झाले आहेत

गाजर गँग नावाने काही मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. भाजपने दिलेली आश्वासने, अच्छे दिनची न झालेली पूर्तता तसेच, पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वर टिपेला नेऊन आक्रस्ताळेपणाने केलेली भाषणे या मेसेजला कारणीभूत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यातील सभेत झालेला पोपट आणि भाजपचे ढिसाळ नियोजन याचाही जोरदार समाचार या मेसेजमधून घेतला जात आहे.

हे फोटो सोशल मीडियात Gajar gang नावाने व्हायरल झाले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची भाजपचे नेते करत असलेली नक्कल तसेच या नेत्यांकडून सरकार म्हणून आपण काय केले हे सांगण्यापेक्षा मोदींनी काय केले. केंद्रातील सरकार कसे आहे, हे सांगण्यावरच अधिक भर होता त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना फार यश आल्याचे दिसत नाही. हे सर्व कमी की काय म्हणून त्यात भाजपने दिलेल्या आश्वासनांचीही भर पडली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने लोकांना भरभरून आश्वासने दिली. त्यात काळा पैसा भारतात आणण्याचे प्रमुख आश्वासन होते. तसेच, प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यावर १५ लाख रूपये भरण्याचे आश्वासनही दिले होते. या आश्वासनांची पुर्तताच काय पण, त्याची आठवणही भाजपच्या नेत्यांना राहिली नसल्याने भाजपची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे चिन्ह कमळ ही जास्तकरून नेटीझन्सच्या टीकेचा प्रमुख विषय आहे. भाजपच्याने नेत्यांनी सोशल मीडियावरच्या हवेचा वेळीच अंदाज घेतल्यास डॅमेज कंट्रोल करता येऊ शकते. मात्र, आजूनही भाजपचे नेते सत्तेच्या हवेत राहिल्यास सर्वसामान्या जनतेत भाजपविरोधी वातावरण अधिक गडद होईल असे काही जाणकारांचे म्हणने आहे.

1 thought on “सोशल मीडियात गाजर गँगचा धुमाकूळ”

Leave a Comment