बोलिव्हीया- चांदीच्या डोंगरांचा देश


दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हीया देश बर्‍याच जणांच्या ऐकीवातही नसेल. मात्र जगात सर्वा्धिक चांदीच्या खाणी असलेला हा देश आहे व तीच त्याची खरी ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रसपाटीपासून ४०९० मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नांवही पोतोसी असेच आहे. येथील डोंगररांगात १.२२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चांदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. ते पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात आहे.

पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते. येथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नांव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आत्तापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आत्तापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरशः लक्षावधी लोक प्राणास मुकले आहेत असे सांगितले जाते.

Leave a Comment