चीन बाजारात हुवाईने विकले सर्वाधिक स्मार्टफोन


चीनच्या फोन बाजारात सर्वाधिक स्मार्टफोन विकण्यात हुवाईने बाजी मारली असून त्यांनी अॅपल, सॅमसंग, शाओमी या कंपन्यांना मागे सारत हे यश मिळविले आहे. २०१६ च्या चौथ्या तिमाहीत चीनमध्ये १३.१६ कोटी स्मार्टफोन विकून हुवाई टॉपवर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ आप्पो, विवो दोन व तीन नंबरवर आहेत. भारतात हीट ठरलेली शाओमी चार नंबरवर तर अॅपल पाच नंबरवर आहे.

सिंगापूर मार्केट रिसर्च कंपनी केनटिस च्या अहवालानुसार जगात जेवढे स्मार्टफोन विकले जातात त्यातील एक तृतीयांश फोन चीनच्या बाजारात विकले जातात. २०१६ च्या चौथ्या तिमाहीत चीनच्या स्मार्टफोन विक्रीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक विक्री नोंदविली गेली आहे. या वर्षात चीनमध्ये ४७.६५ कोटी स्मार्टफोन विकले गेले असून त्यात हुवाईचा हिस्सा ७.६२ कोटी इतका आहे. आप्पोने ७.३२, विवोने ६.३२ फोन विकले आहेत.२०१७ सालातही या कंपन्यांनीतील स्पर्धा अशीच तीव्र असेल असा अंदाज वर्तविला गेला आहे.

Leave a Comment