सध्या हरियाणातील विधी नावाच्या शाळकरी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजत असून तिने ‘बता मेरे यार सुदामा रे’ हे भजन गायिले आहे. हे गाणे यूट्यूबवर तिच्या संगीत शिक्षकांनी अपलोड केले आणि हा हा म्हणता हे गाणे लोकप्रिय झाले. आजपर्यंत ३ कोटी ३ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
३ कोटीहून अधिक लोकांनी पहिला १४ वर्षाच्या ‘विधी’च्या भजनाचा व्हिडिओ
हे गाणे हरियाणातील रोहतक गावातील विधीने आपल्या आईकडून ऐकले. हे गाणे तिने शाळेतील आपल्या शिक्षकांना ऐकवले. या संगीत शिक्षकाने हे भजन संगीतबध्द केले आणि याची चर्चा सुरू झाली. विधी आणि तिच्या या ग्रुपला अनेक ठिकाणी निमंत्रणे मिळत असून त्यांचा सत्कारही सर्वत्र होतो. असे असले तरी विधी या प्रसिध्दीचे सर्व श्रेय आपल्या संगीत शिक्षकांना देते.