ही बाईक एका चार्जमध्ये कापेल ८०० किमी.अंतर


जगभरातील ऑटो कंपन्या प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आणि कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त मायलेज देणारी वाहने तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. टेस्ला, शेव्हरले कंपन्यांनी या समस्येवर तोडगा काढू शकणार्‍या त्यांच्या इलेक्ट्रीक कार्स बाजारात आणून आघाडी घेतली असतानाच लाईटनिंग मोटरसायकल्स या दुचाकी उत्पादक कंपनीने एकदा चार्ज केल्यानंतर ५०० मैल म्हणजे ८०५ किमी अंतर कापू शकणारी पूर्णपणे इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणली जात असल्याची घोषणा केली आहे.

या कंपनीचे प्रमुख रिचर्ड हॅटफिल्ड या संदर्भात म्हणाले, इलेक्ट्रीक बाईक बनविण्याचे आमचे रेकॉर्ड खूप जुने आहे. २००६ सालात आम्ही पहिली इलेक्ट्रीक स्पोर्टस बाईक बनविली तेव्हाही ते रेकॉर्डच ठरले होते. तीन वर्षांपूर्वी वर्ल्ड लँड स्पीड रेकॉर्ड रचणारी पहिली इलेक्ट्रीक पॉवर्ड बाईक आम्हीच बनविली होती. २०१३ मध्ये आमच्या बाईकने १२ मैल रेस क्लाईंबिग स्पर्धा जिंकली होती. आता आमचे लक्ष्य सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस हे ५०० मैलाचे अंतर एका सिंगल चार्जमध्ये कापू शकणारी बाईक बनविणे हेच होते व ते पूर्णत्वास नेले जात आहे. या बाईक चे फिचर्स अजून उघड केले गेलेले नाहीत.

Leave a Comment