मुंबई – आपल्या ‘यु’ सीरिजचे स्मार्टफोन प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी एचटीसीने बाजारात आणले असून या सीरिजमधील एचटीसी यु अल्ट्रा आणि यु प्ले लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
आजपासून ड्युअल डिस्प्लेवाल्या एचटीसी यु सीरिजची विक्री !
या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी असे दोन व्हेरिएंटही देण्यात आले आहेत. सेकंडरी डिस्प्लेसोबतच या स्मार्टफोनमध्ये ऑटो फेस डिटेक्शन, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसारखे फीचर्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ड्युअल डिस्प्लेसोबत येणाऱ्या या स्मार्टफोनची बऱ्याच काळापासून ग्राहकांना प्रतिक्षा होती.
एचटीसी यु स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड नॉगट ७.०, ऑपरेटिंग सीस्टिम, ४ जीबी रॅम, २.१५GHz क्वाड कोअर क्वालकॉमचा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा प्रायमरी डिस्प्ले ५.७ इंच तर सेकंडरी २ इंच, एचडी रिझॉल्यूशनचा आहे. यात १६ मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ६४ जीबी आणि १२८ जीबी मेमरीच्या दोन व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे.