पीएफ काढणे आता होणार आणखीन सुलभ


नवी दिल्ली – आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सर्व व्यवहार ऑनलाईन होणार असल्यामुळे पीएफ धारकांना कार्यालयांचे खेटे मारावे लागणार नाहीत. येत्या मे महिन्यापासून ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ची (ईपीएफओ) ही बहुचर्चित सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

‘पीएफ’ काढून घेणे किंवा पेन्शन मिळणे यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करावी न लागता लवकरच ही कामे ऑनलाइन होणार आहेत. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत ईपीएफओधारकांना आधार कार्ड क्रमांक ईपीएफओला सादर करावा लागेल. आधार कार्ड क्रमांक जोडला असेल, तरच रक्कम मिळेल.

Leave a Comment