आता ५० हजारावर काढू शकता बचत खात्यातून पैसे


मुंबई: आपल्या बचत खात्यातून आजपासून बँक खातेधारकांना पैसे काढण्याची मर्यादा वाढणार असून आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. बचत खात्यातून पैसे काढण्यावर नोटाबंदी निर्णयानंतर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून बचत खात्यातून आठवड्याला ५० हजारापर्यंत रक्कम काढणे शक्य होणार आहे. यापुर्वी ही मर्यादा २४ हजार इतकी होती.

फक्त २४ हजारापर्यंत रक्कम काढणे नोटाबंदी निर्णयानंतर बँकेतून आठवड्याला शक्य होते. पण आता हा रकमेचा आकडा ५० हजार करण्यात आला आहे. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला २४ हजार किंवा महिन्याला ९६ हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्याने रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचे अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी काही दिवसांपुर्वी स्पष्ट केले होते.

१३ मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच यासंदर्भात घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. चलन तुटवडा असल्याने तसंच बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्याने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लावण्यात आले होते.

Leave a Comment