आता कोंबड्या देखील करणार उसनवारी गर्भधारणा


नवी दिल्ली: मानवासाठी असलेल्या या सरोगसी तंत्रज्ञानाची सुधारित आवृत्ती शास्त्रज्ञांनी कोंबड्यांसाठी विकसित केली असून आपले स्वत:चे अंडे घालण्यास असर्मथ असलेली कोंबडी मात्र दुसर्‍या कोंबड्यांची अंडी आपल्या पोटात वाढविण्यास सक्षम असलेली कोंबडी शास्त्रज्ञांनी निर्माण केली आहे. इतर कोंबड्यांसाठी ही एकप्रकारे सरोगेट कोंबडी आहे. विशेष म्हणजे ही सरोगेट कोंबडी फक्त दुसर्‍यांचेच अंडे आपल्या पोटात वाढवते. या अंड्यांद्वारे होणार्‍या पिल्लांमध्ये या सरोगेट कोंबडीचे कोणतीही जनुके नसतात. म्हणजेच अशा अंड्यांमधून येणारी पिले ही संकरित नसून त्यामध्ये केवळ डोनर कोंबडीचीच जनुके असतात.

हे तंत्रज्ञान दुर्मिळ प्रजातीच्या कोंबड्यांची पैदास वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोंबड्याच्या स्कॉट्स डंपी, मार्श डेझी आणि क्रिम लेगबार या प्रजाती अतिशय दुर्मिळ आहेत. या प्रजाती नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी हे सरोगेट कोंबडीचे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. तसेच गोठवून ठेवलेले शुक्राणू आणि मूळ पेशींच्या मदतीने कोंबड्यांची निर्मिती करण्याचा मार्ग यामुळे खुला होणार आहे.

Leave a Comment