आज्जी शिक गं- अ,आ,इ


ठाणे जिल्ह्यातील फांगणे गावात जर कधी सकाळच्या वेळात चक्कर मारायची वेळ आलीच, तर गुलाबी रंगाच्या साड्या नेसून, हातात पाटीपेन्सिल असलेले दफ्तर घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांना जरूर भेटा. या विद्यार्थीनी शाळेत जाणार्‍या अन्य विद्यार्थींनींप्रमाणेच आहेत फक्त त्यांचे वय ६० ते ९० वर्षांचे आहे. होय, या गावात आज्यांची शाळा भरते व तेथे २९-३० आज्या नियमाने हजेरी लावतात. त्या अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे अक्षरे गिरवतात, कविता म्हणून दाखवितात कारण या सगळ्या विद्यार्थीनी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थीनी आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक बांगड यांनी गावातच्या आज्ज्यांना साक्षर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यांना मोतीराम चॅरिटेबल ट्रस्टकडून सहकार्याचा हात मिळाला आहे. या गावातला मुख्य व्यवसाय शेती आहे पण शेती करून या वृद्ध महिला शिकण्यासाठी शाळेत हजेरी लावत आहेत. ट्रस्टने त्यांना गणवेश, दगडी पाट्या, पेन्सिली व दप्तरे दिली आहेत. या आज्ज्या शाळा अजिबात बुडवत नाहीतच पण मनापासून मुळाक्षरे गिरवतात. आपल्याला आपली भाषा लिहता येतेय, वाचता येतेय याचा त्यांना खूप आनंद होतोय शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे.

सुरवातीला थोड्याशा गोंधळलेल्या, शाळेत जाण्याच्या कल्पनेने लाजून कांहीशा कावर्‍या बावर्‍या झालेल्या या आज्ज्या आता मात्र शाळेत चांगल्याच रूळल्या आहेत.

Leave a Comment