अजूनही चोवीस तास नोटछपाई सुरूच


दिल्ली- केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर बँका, एटीएम समोर लागलेल्या लांबच लांब रांगा आता संपल्या आहेत व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे तरीही अजूनही नोटा छापण्याचे काम युद्धबपातळीवर सात दिवस चोवीस तास सुरूच असल्याचे सिक्युरिटी प्रिंटींग मिटींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य प्रवीण गर्ग यांनी सांगितले. या संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले प्रिंटींग प्रेसमध्ये अजूनही तीन शिफ्टमध्ये काम सुरू असून ५०० रूपयांच्या नोटा छापल्या जात आहेत. आत्तापर्यंत १ लाख कोटींहून अधिक मूल्याच्या ५०० रूपयांच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. येथे दररोज २ कोटी २० लाख नोटा छापल्या जात आहेत. आरटीआय अंतर्गत मागविल्या गेलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर झाली तेव्हा रिझर्व्ह बँकेकडे २ हजार रू. मूल्याच्या ४.९५ लाख नोटा होत्या. मात्र ५०० रूपयांची एकही नवी नोट नव्हती. त्यांची छपाई नंतर सुरू झाली. संस्थेच्या ९ कार्यालयातील चार मिंट आहेत, चार प्रेस आहेत तर एक पेपरमिल आहे असेही गर्ग यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment