हा आहे सच्चा हिंदुस्थानी मुसलमान


सध्या भारतालाच नव्हे अवघ्या जगाला ‘इस्लामोफोबिया’ ने वेढले आहे. मागील तीन वर्षात देशात असहिष्णुतेवरुन चांगलेच वातावरण पेटले होते आणि विषयाला घेऊन भरपूर चर्चा देखील झाल्या. त्यातच काही लेखकांनी तर पुरस्कार वापसीची मोहीम देखील राबवली. पण नुकतेच हुसैन हैदरी नामक कवीने हिंदुस्थानी मुसलमान शीर्षकाने कविता लिहिली आहे. या कवितेत त्याने भारतातील विविधता आणि एकात्मतेवर प्रकाश टाकला आहे. त्याची ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आता पर्यंत ८५ हजार लोकांनी ही कविता ऐकली आहे.