आजची दुनिया स्मार्ट दुनिया आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच पासून स्मार्ट सिटी अशी प्रगती वेगाने होत आहे. त्यात आता नेहमीच्या वापरात असलेले दागिनेही स्मार्ट होऊ पहात आहेत. सेंसटोन नावाच्या कंपनीने आकर्षक दागिना म्हणून वापरता येईल व त्याचबरोबर तुमची अनेक कामे करेल असे एक उपकरण तयार केले आहे. हा दागिना महिला पुरूष दोघेही वापरू शकतील. तसेच तो घातला असतानाच आपल्या कामांची यादी, सुचलेल्या कल्पना, नोटसही त्याच्या सहाय्याने बनविता येतील.
स्मार्ट दागिना करेल अनेक कामे
हे उपकरण म्हणजे एक इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाईस आहे. ते तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकते व अॅपच्या सहाय्याने तुमच्या मोबाईलवर संबंधित संभाषण पाठवू शकते. तुम्हाला अन्य कामे करत असतानाच कांही कामे नंतर करायची असतील व ती लक्षात ठेवायची असतील तर या उपकरणाचे एक बटण हलकेच दाबून तुम्ही तशा सूचना रेकॉर्ड करू शकता. यात कामाची यादीही करता येते. ब्ल्यूटूथच्या मदतीने हे उपकरण हे अॅपला जोडता येते व अॅप कनेक्ट झाल्यावर रेकॉडिग फोनवर पाठविेले जाते. विशेष म्हणजे ऑफलाईन असतानाही हे रेकॉडिग करता येते फक्त ऑनलाईन झाल्यावर ते तुमच्या फोनवर येते. या उपकरणाचा वापर, नेकलेस, घड्याळ, टायपिन, स्कार्फपिन असा करता येतो.
हे उपकरण इंग्रजीसह ११ भाषांत काम करते त्यात मँडरीन व युक्रेनियन भाषांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या उपकरणावर रेकॉर्डिंग करताना टाईपिग करण्याची गरज नाही. तुमच्या आवाजाला ते शब्दांमध्ये ट्रान्सक्राईब करू शकते.