टाटा मोटर्सने लो बजेट कार बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली असून ही नवी कार नॅनो मेगापिक्सल नावाने बाजारात येणार आहे. ही कार १०० किलोमीटरचे मायलेज देईल व त्यामुळे तिच्या किंमतीच्या मानाने ती सहज परवडणारी ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. बाईकपेक्षाही जास्त मायलेज देणार्या या कारमधून चार प्रवासी आरामात प्रवास करू शकणार आहेत.
नॅनो मेगापिक्सल देणार १०० किमीचे मायलेज
ही कार पेट्रोलसह बॅटरीवरही चालणार आहे. या कारची बॅटरी अर्ध्या तासात ८० टक्के चार्ज करता येते व चार्जिंग साठी कार थांबविण्याची गरज पडत नाही.या कारला लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी दिली गेली आहे व ती पेट्रोल इंजिन जनरेटरवर चार्ज होऊ शकते. त्यामुळे कार सुरू असतानाही ती चार्ज करता येते व त्यासाठी पेट्रोलचा वापर अगदी अत्यल्प केला जातो. कारचे इंजिन थोडे लहान म्हणजे ३२५ सीसीचे आहे. मात्र कारसाठी वापरलेले तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. ही कार जिनेवा मोटर शो मध्ये सादर केली गेली होती. या वर्षअखेर ती भारतात लाँच केली जाईल. या कारच्या किमतीबाबत अजून खुलासा झालेला नाही मात्र तज्ञांच्या अंदाजानुसार ती चार ते पाच लाख रूपयांत येईल.