घरात पाळलेल्या खारीने घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा प्रकार अमेरिकेतील इडाहो येथे घडला आहे. घरफोडीसाठी आलेल्या किशोरवयीन मुलाला खाजवून त्याला या खारीने घाबरवले होते.
अमेरिकेत पाळीव खारीने उधळला घरफोडीचा प्रयत्न
या किशोरवयीन चोराची ओळख पोलिसांनी उघडकीस केली नाही. मात्र या खारीने केलेल्या हल्ल्यामुळे तो घाबरून गेला होता कारण अचानक खार अंगावर येईल, याची त्याने अपेक्षाच केली नव्हती. त्यामुळे जे हाती लागेल ते घेऊन तो पळून गेला, असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलिस अधिकारी अॅशली टर्नर यांनी दिली.
जोई असे या खारीचे नाव आहे. ती माझ्या घरात सहा महिन्यांपासून राहत आहे, असे या खारीचे मालक अॅडम पर्ल यांनी सांगितले. पर्ल यांना एका उद्यानात ती सापडली होती.
जोईला परत उद्यानात सोडून देण्याची माझी इच्छा होती. मात्र आता मला काही सुचत नाही. माझी द्विधा मनःस्थिती झाली आहे, असे पर्ल यांनी सांगितले.