देशात पहिल्यांदाच होणार हींगची शेती


नवी दिल्ली – प्रत्येक भाजीत थोड्या मात्रात वापरण्यात येणार्‍या हींगचा वापर भारतात सर्वाधिक प्रमाणात केला जातो. जगभरात उत्पन्न होणार्‍या एकूण हींगच्या 40 टक्के वापर भारतात केला जातो. मसालांच्या पदार्थापासून औषधासाठी हींगचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, भारतात हींगचे उत्पादन घेतले जात नाही.

भारताला हींगची आयात करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन खर्ची करावे लागते. तरीही कोणत्याही सरकारने किंवा कृषी विद्यापीठांनी हींगाचे उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आणि भारतातील शेतकर्‍यांना नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी इंडियन कॉफी बोर्डचे सदस्य डॉ. विक्रम शर्मा यांचा अभ्यास सुरू आहे. यासाठी डॉ. शर्मा यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून ते स्वत:च त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विक्रम यांनी हींग शेती करण्याचा निश्‍चय केला असून त्यासाठी त्यांनी इराणमधून हींगचे बी मागविले आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथील डोंगराळ भागात त्यांनी हींगची शेती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील सोलन, लाहौल-स्फीति, सिरमौर, कुल्लू, मंडी आणि चंबा येथेही हींगची शेती करू इच्छित आहेत. डॉ. शर्मा म्हणाले, मी उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि नेपाळलगत असलेल्या प्रदेशात हींगची शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

काय आहेत अडचणी?
हींगची शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बी मिळविणे खूप कठीण काम आहे. जगभरात हींगची शेती मुख्यता। अफगानिस्तान, इराण, इराक, तुर्कमेनिस्तान आणि बलूचिस्तान येथे होते. या देशांमध्ये हींगचे बी अन्य देशांना विकल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येते. डॉ. शर्मा म्हणाले की, त्यांनी संशोधन करण्यासाठी मोठ्या परिश्रमानंतर हींगचे बी इराणवरून मागविले आहे. यातून देशातील विविध भागात हिंगची शेती करण्यास सुरूवात करण्यात येईल.

Leave a Comment