केवळ ५०० रूपयांत चंद्रावर स्वतःची नेमप्लेट लावा


चंद्रावर जावे असे सर्वसामान्य माणसांचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येईल हे सांगणे आत्ताच अवघड असले तरी चंद्रावर आपल्या नावाची नेमप्लेट लावणे मात्र शक्य होणार आहे व तेही केवळ ५०० रूपये खर्चात. भारतातील स्टार्टअप कंपनी टीमइंडसने हा प्रोजेक्ट हाती घेतला असून त्यात कुणीही भारतीय ५०० रूपये भरून स्वतःचे नांव चंद्रावर कोरू शकेल. कंपनीकडे आत्तापर्यंत १० हजार जणांनी त्यासाठी नोंदणीही केली आहे. बंगलोरया या कंपनीचा प्रोजेक्ट २८ डिसेंबर २०१७ ला सुरू होईल. या दिवशी पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीवरून चंद्रावर अंतराळ यान लाँच केले जाणार असून ते २६ जानेवारी २०१८ ला चंद्रावर पोहोचेल. यातून एक छोटा अॅटोमेटेड रोबो पाठविला जाईल व चंद्रावर फिरून तो फोटेा व व्हिडीओ पाठविणार आहे. येथून लोकांच्या नावाच्या नेलेल्या नेमप्लेट तो चंद्रावर ठेवेल. चंद्रावर रोबो पाठविण्यासाठी फंडींग जमा करावे म्हणून टीमइंडसने ही कल्पना राबविली आहे.

खरे म्हणजे गुगलने लूनार एक्स्प्रेस नावाने जी स्पर्धा जाहीर केली आहे त्यात चंद्रावर प्रथम पोहोचणार्‍या रोबोला १७० कोटी२७ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यात रॉकेटच्या सहाय्याने चंद्रावर रोबो पाठवून त्याने ५०० मीटर चालून एचडी फोटेा व व्हिडीओ पाठवायचे आहेत. टीमइंडसने या स्पर्धेत भाग घेतला असून रोबो चंद्रावर पाठविण्यासाठी अंतराळ संस्था इस्त्रो बरोबर करारही केला आहे. त्यांचा रोबो चंद्रावर पोहोचला तर चंद्रावर यान पाठविणारी ती पहिली खासगी कंपनी बनेल. कंपनीने इसीए नावाने रोबो तयार केला आहे. ईसीए म्हणजे एक छोटीसी आशा. लँडींगचे उत्तम तंत्रज्ञान सादर केल्याबद्दल त्यांना गुगलकडून १० लाख डॉलर्सचे बक्षीसही दिले गेले आहे. या कंपनीला २६ जानेवारी २०१८ ला चंद्रावर भारताचा तिरंगा फडकविण्याचीही इच्छा आहे.

Leave a Comment