अॅपल भारतात तयार करणार आयफोन एसई


अॅपलने त्यांचे आयफोन एसई हे मॉडेल भारतात असेंबल करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू केले असून त्याची सुरवात कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर विस्ट्राॅनच्या कर्नाटकातील प्रकल्पात करण्यात येणार आहे. या प्रकल्पात वर्षाला ३ ते ४ लाख आयफोन असेंबल केले जातील असे समजते. अॅपलने हा प्रकल्प हाती घेताना भारत सरकारकडून मिळणार्‍या कर सवलती व अन्य मागण्या पूर्ण होण्याची वाट न पाहण्याचा निर्णय घेतला असून भारतातील उत्पादनाचा अनुभव घेण्यास अॅपल उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे.

अॅपलने भारतातील प्रकल्प सुरू करताना ज्या मागण्या निश्चित केल्या आहेत त्या भारतात उद्योग विस्तार करण्याच्या व्यापक योजनेचा भाग असल्याचे समजते. येत्या एप्रिलपासून विस्ट्राॅल स्थानिक असेंबलचे काम सुरू करणार आहे. भारतात उद्योग विस्तार करताना अॅपलला त्यांच्या उत्पादनांच्या अधिक किंमती हा मोठा अडसर आहे. अॅपलची नवी मॉडेल्स ५० हजार रूपयांपासून सुरू होतात व भारतात ७० ते ८० टक्के ग्राहक १० हजार रूपयांपर्यंतचे फोन घेण्यास सर्वाधिक पसंती देतात. भारतात उत्पादनामुळे अॅपलला त्यांची उत्पादने कमी किमतीत विकणे शक्य होणार आहे. भारतात आयफोन एसईची किंमत सध्या ३० हजार रूपये असून ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment