यू-ट्युबच्या जबरदस्तीच्या जाहिरातीतून होणार सुटका


नवी दिल्ली – लवकरच तुमची-आमची युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी सुरू होणारी ३० सेकंदांच्या जबरदस्तीच्या जाहिरातीतून सुटका होणार आहे. एखादा व्हिडीओ जर तुम्हाला यू-ट्युबवर पाहायचा असले तर त्यापूर्वी ३० सेकंदाची वगळता न करता येणारी जाहिरात जबरदस्तीने पाहावी लागते. यू-ट्युब ३० सेकंदात जणू युजर्सच्या संयमाची परीक्षाच घेत आहे, असे वाटते.

पण आता आगामी वर्षापासून यू-ट्युब अशा जाहिराती बंद करणार असल्याची माहिती आहे. ही बातमी तमाम यू-ट्युब युजर्ससाठी दिलासादायक आहे, असेच म्हणावे लागेल. साधारणतः यू-ट्युबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी ३० सेकंदांची (मस्ट) जाहिरात सुरू होते, ती वगळता येत नसल्याने जाहिरात पूर्ण पाहण्याशिवाय पर्याय नसतो.

नेहमी यू-ट्युब वापरणाऱ्यांना या जाहिरातींची कटकट सहन करावी लागते. कारण दुसरा कोणताच पर्याय नसल्याने ३० सेकंदांची पूर्ण जाहिरात पाहणे त्यांना भाग असते. यावर यू-ट्युबने असे सांगितले आहे की, युजर्संना दिलासा देण्यासाठी आम्ही या जाहिराती हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यू-ट्युबला या जाहिरातींमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा होतो. साहजिकच, या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

Leave a Comment