झिऑक्सचा ५० तास बॅटरी बॅकअप देणारा फोन


बॅटरी बॅकअप चांगला हवा असा ग्राहक असणार्‍या ग्राहकांसाठी झिऑक्स कंपनीने असा मोबाईल सादर केला आहे जो या ग्राहकांना एकदमच आवडून जाईल. कमी किंमतीतल्या या फिचर फोनमध्ये अनेक खुब्या आहेत. भारतीय बाजारात पॉवरफुल बॅटरीचा फिचर फोन झिऑक्स थंडर मेगा नावाने लाँच केला गेला आहे. हा फोन १८०३ रूपयांत सर्व रिटेल व ऑनलाईन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

या फोनला ४ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली असून ती ५० तासांचा टॉकटाईम देते असा कंपनीचा दावा आहे. २.४ इंची डिस्प्ले, सेफ्टी अॅलर्ट म्हणून काम करणारे एसओएस बटण, इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, डिजिटल रियर एलईडी फ्लॅशसह चांगला कॅमेरा, फोर एलईडी टॉर्च, वायरलेस एफएम, मोबाईल ट्रॅकर, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment