लवकरच बदलणार डेबिटकार्डवरील व्यवहार?


एक नवीन प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेने तयार केला असून त्या प्रस्तावानुसार डेबिट कार्डद्वारे व्यवहारावर किती चार्जेस आकारावेत यावर आरबीआय ठोस बदल करणार आहे. या प्रस्तावावर ३१ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती स्वीकारल्या जातील. कोणतेही ठोस बदल यात नसले, तर १ एप्रिल २०१७ पासून आरबीआयने तयार केलेला प्रस्ताव जसाच्या तसा देशभर लागू होईल.

काय आहेत नवे बदल?
१) लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यासाठी स्वाईप मशिनवर (पाँईट ऑफ सेल) व्यवहारासाठी चार्ज म्हणजे MDR जास्तीत जास्त ०.४ टक्के असेल.

२) जर १००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर जास्तीत जास्त ४ रुपये आकारले जातील. मात्र, जर १००० ते २००० रुपया दरम्यानच्या व्यवहारावर हीच रक्कम ८ रुपये असेल.

३) दुकानात स्वाईप मशिनऐवजी QR कोडद्वारे म्हणजे भीम किंवा पेटीएमसारख्या अॅपद्वारे व्यवहार केल्यास ०.३ टक्के चार्ज आकारला जाईल. म्हणजेच १००० रुपयांच्या व्यवहारावर ३ रुपये चार्ज असेल.

४) सर्व्हिस चार्जचे हे नवे दर वीज, पाणी इत्यादींसह आर्मी कॅन्टिन किंवा विमा प्रीमियमवरही लागू असतील.

५) २० लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांसाठी व्यवहारावर MDR चे दर ०.९५ टक्के असेल. म्हणजेच १००० रुपयांवर जास्तीत जास्त साडेनऊ रुपये चार्ज द्यावा लागेल.

६) पासपोर्ट फी, टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रोड टॅक्स किंवा प्रॉपर्टी टॅक्सचा भरणा करण्यासाठी विशेष दर निश्चित करण्यात आले आहेत. १००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर ५ रुपये, १००० ते २००० रुपयांदरम्यानच्या पेमेंटवर १० रुपये आणि २००० रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेवर जास्तीत जास्त २५० रुपये चार्ज आकारला जाईल.

६) आरबीआयने लागू केलेल्या सर्व्हिस चार्जच्या नव्या दरांसोबत कोणत्याही प्रकारचे सुविधा कर किंवा अतिरिक्त सर्व्हिस चार्ज व्यापारी किंवा सेवा देणारी एजन्सी आकारु शकत नाही, असे आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

आरबीआयने प्रस्तावात म्हटले आहे की, डेबिट कार्डवर पेट्रोल-डिझेलची खरेदी केल्यानंतर आकारला जाणाऱ्या चार्जबाबत अंतिम निर्णय तेल कंपन्या आणि सरकारमध्ये चर्चा करुन घेतला जाईल. रिझर्व्ह बँक डेबिट कार्डवरील चार्जची मर्यादा ठरवू शकते, मात्र क्रेडिट कार्डवरील मर्यादा ठरवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला नाही. कारण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून काही विशिष्ट कालावधीसाठी उधारीच्या स्वरुपात काही रक्कम घेतली जाते, तर डेबिट कार्डद्वारे खर्च केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावरून लगेच वजा होते.

Leave a Comment