मंगळावर शहर वसविणार यूएई


यूएईचे उपाध्यक्ष, पंतप्रधान व दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम व अबुधाबीचे प्रिन्स व यूएई डेप्युटी सुप्रीम कमांडो शेख मोहम्मद बिन झाएद अल नहयान यांनी मंगळावर २११७ पर्यंत म्हणजे १०० वर्षात शहर वसविण्याची योजना आखली असल्याचे जाहीर केले आहे. जागतिक शासन परिषदेत ही घोषणा केली गेली असून या परिषदेत विविध देशांची १३८ सरकारे, ६ आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुख्य संस्था व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागकि लिडींग कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना व वैज्ञानिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे म्हटले आहे.

यूएईमधील तरूणांना विज्ञानात संशोधन करण्याची संधी मिळावी व देशाने अंतराळ विज्ञानात चांगली प्रगती करावी यासाठी वैज्ञानिक संशोधन कार्यक्रम आखला गेला असून विद्यापीठातून संशोधनासाठी योग्य त्या सुविधा दिल्या जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. मंगळावर वस्तीसाठी अंतराळ प्रवास साधने संशोधन, कमी वेळात मंगळापर्यंतचे अंतर कापू शकतील अशी स्पेशशीप,उर्जा, इत्यादी आवश्यक बाबींवर दीर्घ संशोधन गरजेचे आहे हे लक्षात घेऊन अरब देशातील तरूणांना संशोधनासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. मंगळावरील शहरासंदर्भात एक प्रेझेंटेशनही यावेळी दाखविले गेले. अर्थात ही योजना दीर्घकालीन स्वरूपाची आहे.

अरब देशांनी २०१५ मध्येच मंगळ शोध मिशन हाती घेतले असून अरब जगाचे पहिले अंतराळयान २०२१ ला मंगळावर उतरणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment