डीटीयूच्या विद्यार्थ्याला सव्वा कोटीचे पॅकेज


नवी दिल्ली – दिल्ली औद्योगिक महाविद्यालयातील बीटेक कॉम्प्युटर इंजियिअरिंगच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी सिद्धार्थ राजा याला उबर कंपनीने (यूएसए) एक कोटी 15 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेजची ऑफर दिली आहे. सिद्धार्थने अनेक अडचणींचा सामना करत मागील वर्षी इंटरनशिप दिल्यानंतर उबर कंपनीने त्याला आपल्या सोबत काम करण्याची संधी दिली आहे.

तरुणांना संदेश देताना सिद्धार्थ राजा म्हणाला की, यश मिळो किंवा ना मिळो. मात्र, कठिन परिश्रम केलेच पाहिजे. कारण खरे परिश्रमच तुम्हाला यश मिळवून देतात. दिल्ली स्थित वसंतकुंज येथे राहणार्‍या सिद्धार्थ राजाचे वडील कंसलटेंट आणि आई फ्री लान्सर म्हणून हिंदी व इंग्रजीचे ट्रान्सलेटर काम करतात. तर छोटा भाऊ दहावीत शिकत आहे.

वसंतकुंज येथील डीपीए स्कूलमधून पासआऊट सिद्धार्थ म्हणतो की, मला लहानपणीपासून कॉम्प्युटरमध्ये काही नवीन शोधण्याचा जुनून होता. यामुळे मी बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, बीटेकच्या तिसर्‍या वर्षी इंटरनशिपसाठी अनेक कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. मात्र, उबर युएसएने इंटरनशिपमध्ये माझी निवड केली.

या नियुक्तीचा मेल कंपनीने गुरुवारी दुपारी सिद्धार्थ व महाविद्यालयाला पाठविला आहे. सिद्धार्थच्या मते, उबर कंपनीत ग्रेज्युएशनची डिग्री मिळण्यापूर्वीच चांगल्या पॅकेजसह प्लेसमेंट मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. उबर कंपनीत मला खुप काही शिकायला मिळेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी मागील वर्षी डीटीयूच्या एका विद्यार्थ्याला गुगलने सव्वा कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजची ऑफर दिली होती.

Leave a Comment