आता ‘फेसबुक’वरूनही शोधा नोकरी!


आताच्या घडीला प्रत्येकजण ‘फेसबुक’वर मित्र-मैत्रिणींचे स्टेट्स अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, फनी व्हिडिओज, कोट्स हे तर बघत असतोच. पण आता या सगळ्यासोबत तुम्ही ‘फेसबुक’चा नोकरी शोधण्यासाठीही उपयोग करू शकणार आहात. अमेरिका आणि कॅनडामधील यूजर्ससाठीच ही सुविधा सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण पुढील काळात ती अन्य देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल.

‘फेसबुक’ने ही नवी सुविधा ऑनलाईन विश्वातील अधिकाधिक यूजर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. आजही जी लोक ‘फेसबुक’पासून दूर आहेत. या निमित्ताने ते तरी या सोशल नेटवर्किंग साईटकडे वळतील आणि फेसबुकची प्रसिद्धी वाढेल, असा कंपनीचा हेतू आहे. नोकरीच्या शोधात किंवा काम मिळवण्याच्या शोधात असलेले यूजर्स आज अन्य लिंक्डइन किंवा मॉन्स्टर डॉट कॉम या सारख्या साईटकडे वळतात. तिथे स्वतःचे प्रोफाईल अपडेट करून यूजर्स नोकरीचा शोध घेत असतात. आता नोकरीच्या शोधासाठी इतर कोणत्याही साईटवर वेगळे प्रोफाईल तयार करण्यापेक्षा ‘फेसबुक’वरच्या प्रोफाईलमधूनही तुम्ही तु्म्हाला हवी असलेली नोकरी शोधू शकणार आहात.

Leave a Comment