२८ फेब्रुवारीला जिओचा आणखी एक धमाका?


नवी दिल्ली : एक संयुक्त पत्रकार परिषद भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि दक्षिण कोरियातील दिग्गज सॅमसंग कंपनी घेणार असून स्पेनच्या बार्सिलोना शहरात २६ फेब्रुवारीपासून मोबाईल वर्ल्ड काँग्रेसची सुरुवात होत आहे.यात नवे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान रिलायन्स जिओ आणि सॅमसंग काही मोठी घोषणा करण्याची शक्यता असून यासाठी मीडिया इनव्हिटेशनही पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातही रिलायन्स जिओ पाऊल ठेवू शकते. याशिवाय सॅमसंगसोबत काही करारही केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोकल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिओ आपली पकड अधिक मजबूत करु शकेल.

Leave a Comment