मोदींवर मार्क झुकेरबर्ग यांची स्तुतीसुमने


न्यूयॉर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी स्तुती केली असून सोशल मिडियाचा वापर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी थेट संवाद साधला आणि कारभारात पारदर्शकता आणली असे ते म्हणाले आहे. झुकेरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक मोठी पोस्ट टाकली आहे. भविष्य कसे असावे, हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी आपण काय करू शकतो याची चर्चा त्यांनी या पोस्टमध्ये केली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. लोकशाहीद्वारे निवडून आलेल्या नेत्यांची जबाबदारी केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जनतेशी आपला संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमांचा योग्य वापर करून जनतेशी आपला संपर्क ठेवला आहे. तसेच आपल्या मंत्र्यांनांही त्यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संपर्क ठेवावा असे आवाहन केले आहे. हे प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले. मंत्र्यांना केलेले कामे आणि त्यांच्या योजना या फेसबुकद्वारे शेअर केल्या जातात. यामुळे आपले काम आपण जबाबदारीने करत आहोत की नाही हे कळते असे ते म्हणाले. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता जनतेच्या समस्या सोडवणे, ही नेत्यांसाठी एक मोठी संधी असल्याचे झुकेरबर्ग म्हणाले. पंतप्रधान मोदींनी नेमकं हेच केले असल्याचे ते म्हणाले. मोदींनी आपल्या मंत्र्यांना फेसबुक वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लोकांकडून थेट प्रतिक्रिया मिळतात आणि प्रशासन त्या प्रमाणे काम करू शकते असे ते म्हणाले.

Leave a Comment